Successful Business Ideas

Successful Business Ideas : आजच सुरू करा ‘हा’ सुपरहिट व्यवसाय; फक्त 3 महिन्यांतच व्हाल मालामाल !

Successful Business Ideas : सध्या माहागाई एवढी वाढली आहे की, फक्त नोकरीवर घर भागत नाही. म्हणूनच बरेचजण सध्या स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याकडे लक्ष देत आहेत. पण सध्या मार्केटमध्ये स्पर्धा इतकी वाढली आहे की, कोणताही व्यवसाय करताना अगदी विचारपूर्वक तसेच बराच अभ्यास करून करावा लागतो. दरम्यान, आज आम्ही तुमच्यासाठी अशी बिजनेस आयडिया घेऊन आलो आहोत, जो तुम्ही अगदी डोळे झाकून सुरु करू शकता.

सध्या देशात थंडीने दार ठोठावले आहे. अशातच तुम्हाला या सीझनमध्ये व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही या मोसमात कोणत्या गोष्टीची जास्त गरज आहे त्याचा व्यवसाय सुरु केला पाहिजे. तुम्ही या मोसमात उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू करू शकता. हा एक हंगामी व्यवसाय आहेत. ज्यामध्ये २-३ महिन्यांत मोठी कमाई करता येते. थंडीच्या वातावरणात जॅकेट, स्वेटर, शाल इत्यादी उत्पादनांची मागणी वाढते. जर तुम्हाला किरकोळ विक्री न करता मोठ्या प्रमाणात विक्री करायची असेल, तर तुम्ही होलसेलमध्येही व्यवसाय सुरू करू शकता.

आगामी काळात उबदार कपड्यांची मागणी आणखी वाढणार असल्याचेही बाजारातील जाणकारांचे मत आहे. अशास्थितीत तुम्ही हा व्यवसाय सुरु करून चांगली कमाई करू शकता.

थंडीच्या मोसमात लोक थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरतात. प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या फॅशननुसार हिवाळ्यात नवीन पोशाखही बाजारात येतात. उबदार कपड्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, आपल्याकडे अधिक विविधता असणे आवश्यक आहे. जेवढी व्हरायटी जास्त तेवढे लोक कपडे खरेदी करतात. अशा परिस्थितीत थंडीच्या मोसमात उबदार कपड्यांच्या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. तुम्ही तुमच्या सोयीनुसार हिवाळ्यातील कपडे ऑनलाइन किंवा ऑफलाइन विकू शकता.

किती खर्च येऊ शकतो?

जर तुम्ही हे काम थोड्या प्रमाणात सुरू केले तर तुम्ही फक्त 2 ते 3 लाख रुपयांमध्ये तुमचा व्यवसाय करू शकता. पण जर मोठ्या प्रमाणावर काम सुरू करायचे असेल तर 5 ते 7 लाख रुपये लागतील.

किती कमाई होईल?

या व्यवसायातील नफा तुमच्या मेहनतीवर अवलंबून असतो. याशिवाय हवामान हा तुमच्या कमाईचा सर्वात मोठा आधार आहे. सरासरी नफ्याबद्दल बोलायचे तर साधारणपणे 30 ते 40 टक्के नफा मिळू शकतो.

येथून करा करा मालाची खरेदी

जर तुम्हाला उबदार कपडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही पंजाब, हरियाणा, राजस्थान किंवा उत्तर प्रदेश इत्यादी ठिकाणांहून ऑर्डर करू शकता. ही सर्व राज्ये लोकरीच्या कपड्यांच्या उत्पादनात आघाडीवर आहेत. तसे, तुम्हाला तुमच्याच शहरात देखील उबदार कपड्यांचे घाऊक विक्रेतेही सापडतील.

हा व्यवसाय सुरू करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

जिथे तुम्ही गोदाम उघडत आहात, ती जागा कोरडी असावी. लक्षात ठेवा की दमट ठिकाणे तुमच्या लोकरी आणि उबदार कपड्यांसाठी वाईट आहेत. ओलाव्यामुळे लोकरीच्या कपड्यांमध्ये बुरशी येते. त्यामुळे तुमचे नुकसान होण्याची अधिक भीती आहे.