Jio Prepaid Plan : जिओचा भन्नाट प्लॅन! अवघ्या 20 रुपयात मिळवा मोफत कॉलिंग सह 10GB डेटा, कसं ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Prepaid Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेता आणि जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी कंपनी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनी ग्राहकांच्या बजेटचा विचार करून सर्व रिचार्ज प्लॅन्सच्या किमती ठरवत असते.

कंपनीचे असे अनेक पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहेत जे ग्राहकांच्या खूप फायद्याचे आहेत. असाच एक कंपनीचा रिचार्ज प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्हाला 20 रुपयात जास्त 10GB डेटा, मोफत कॉलिंग आणि SMS दिले जात आहेत.

कंपनीचा 179 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

कंपनीच्या 179 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 1GB डेटा दिला जात असून या प्लॅनची ​​वैधता 24 दिवसांची आहे. तसेच, यामध्ये जिओ ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस फायदे उपलब्ध आहे. इतकेच नाही तर वापरकर्त्यांना या प्लॅनसह JioTV, JioCinema, JioCloud आणि JioSecurity चे मोफत सबस्क्रिप्शन देण्यात येत आहे. FUP डेटा संपला की, इंटरनेटचा वेग 64Kbps पर्यंत कमी केला जातो.

कंपनीचा 199 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

23 दिवसांची वैधता असणाऱ्या कंपनीच्या या प्लॅनमध्ये 1.5 GB प्रतिदिन दराने एकूण 34.5 GB डेटा ऑफर करण्यात येत आहे. दररोज 100 मोफत SMS सह या प्लॅनमध्ये तुम्हाला देशभरातील सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिले जात आहे. या प्लॅनमध्ये कंपनी ग्राहकांना Jio अॅप्सचा मोफत प्रवेश दिला जात आहे.

जाणून घ्या जिओच्या 179 आणि 199 प्लॅनमधील फरक

जिओच्या या दोन प्लॅनमध्ये फक्त 20 रुपयांचा फरक असून जर तुमचा डेटाचा वापर जास्त असल्यास तुम्ही 199 रुपयांचा प्लॅन निवडू शकता कारण या प्लॅनमध्ये 179 रुपयांच्या प्लॅनपेक्षा 10.5GB जास्त डेटा देण्यात येत आहे. तुम्ही फक्त 20 रुपये जास्त खर्च करून 10GB अतिरिक्त डेटा मिळवू शकता.