Jio चा ‘हा’ प्लान Airtel ला भारी! फ्रीमध्ये मिळत आहे 182GB डेटा ; असा घ्या फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : आज देशातील टॉप 2 टेलिकॉम कंपन्या म्हणजे Jio आणि Airtel ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दररोज काहींना काही ऑफर सादर करत असतात ज्याच्या फायदा यूजर्सना मोठ्या प्रमाणात होत आहे.

यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी वार्षिक रिचार्जसाठी नवीन रिचार्ज प्लॅन शोधात असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला देशातील 2 टॉप टेलिकॉम कंपन्यांचे वार्षिक मोबाईल रिचार्ज प्लॅनबद्दल माहिती देणार आहोत ज्याच्या फायदा घेत तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट रिचार्ज प्लॅनची निवड करू शकतात. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 2999 रुपयांचा वार्षिक प्लॅन देत आहेत. पण दोन्ही योजनांचे फायदे वेगळे आहेत. चला मग जाणून घेऊया या प्लॅनबद्दल सविस्तर माहिती.

Jio Rs 2999 plan

Jio चा 2999 रुपयांचा प्लान 365 दिवसांची वैधता देतो. तसेच, 23 दिवसांची अतिरिक्त वैधता ऑफर केली जाते. अशाप्रकारे, जिओचा 2999 रुपयांचा वार्षिक प्लॅन एकूण 388 दिवसांची म्हणजेच सुमारे 13 महिन्यांची वैधता देतो. या प्लॅनमध्ये डेटासाठी 2.5 GB डेटा दिला जातो.

या प्लॅनमध्ये एकूण 912.5 GB डेटा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये 75 GB हायस्पीड डेटा उपलब्ध आहे. याशिवाय यूजर्स अनलिमिटेड फ्री 5G डेटाचा आनंद घेऊ शकतात. तसेच अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएस सुविधा उपलब्ध आहे. या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन दिले आहे.

Airtel Rs 2999 plan

Airtel च्या या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा दिला जातो. अशा प्रकारे एकूण 730 जीबी डेटा दिला जात आहे. तसेच, Jio प्रमाणे, अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय दररोज 100 एसएमएस दिले जात आहेत. हा प्रीपेड प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो.

जर आपण अतिरिक्त फायद्यांबद्दल बोललो तर त्यात Apollo 24|7 Circle benefit, Rs 100 cashback on Fastag, free Hello Tune आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा मोफत दिला जातो.

कोणता प्लॅन बेस्ट आहे

जिओच्या 2999 रुपयांच्या प्लॅनमध्ये, एअरटेलच्या तुलनेत सुमारे 23 दिवसांची अधिक वैधता दिली जात आहे. तसेच या प्लानमध्ये 182 GB अधिक डेटा दिला जात आहे. तसेच अधिक OTT सबस्क्रिप्शन मिळत आहे.

हे पण वाचा :- Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या ‘या’ 3 गोष्टींचे रोज करा सेवन ; फायदे जाणून उडतील तुमचे होश