Samsung Galaxy : Samsung चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन; कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy : Samsung Galaxy M13 4G आणि Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च झाले आहेत. सॅमसंगने यापूर्वी भारतात Galaxy M13 सीरीज 4G स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स उघड केले होते. आज कंपनीने अधिकृतपणे हा फोन तसेच 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. सॅमसंगचे हे स्मार्टफोन्स भारतात ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आणि Samsung च्या अधिकृत स्टोअरवरून खरेदी करता येणार आहेत.

Samsung Galaxy M13 आणि Galaxy M13 5G या दोन्ही स्मार्टफोनची रचना जवळपास सारखीच आहे. फोनमधील सेल्फी कॅमेरासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. आज आम्‍ही तुम्‍हाला सॅमसंगच्‍या स्‍मार्टफोनची किंमत, फिचर्सची सविस्तर माहिती देणार ​​आहोत.

Samsung Galaxy M13 4G आणि 5G ची किंमत

Samsung Galaxy M13 4G स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 4GB रॅम 64GB स्टोरेज सह या फोनचा बेस व्हेरिएंट 11,999 रुपये किंमतीला आहे. यासोबतच या फोनचे 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल 13,999 रुपये किमतीला आहे.

Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनचा 4GB रॅम 64GB स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपये आहे. या सॅमसंग फोनचा 6GB 128GB व्हेरिएंट 15,999 ला आहे. या दोन्ही स्मार्टफोनची विक्री 23 जुलैपासून सुरू होणार आहे. ICICI बँक क्रेडिट कार्डवर 1000 रू. ची सूट मिळणार आहे.

Samsung Galaxy M13 4G ची वैशिष्ट्ये-

-6.6-इंच फुल एचडी डिस्प्ले
-Exynos 850 प्रोसेसर
-6GB रॅम आणि 64GB/128GB स्टोरेज पर्यंत
-Android 12 वर आधारित One UI Core 4.1
-50MP 5MP 2MP ट्रिपल रिअर कॅमेरा
-8MP सेल्फी कॅमेरा
-6,000mAh बॅटरी 15W चार्जिंग

Samsung Galaxy M13 स्मार्टफोन 6.6-इंचाच्या फुल-एचडी इन्फिनिटी-V डिस्प्लेसह डिजाईन करण्यात आला आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच आणि स्लिम बेझल्स आहेत. या सॅमसंग पॉनमध्ये Exynos 850 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो ग्राफिक्ससाठी Mali-G52, 4GB RAM आणि 64GB/128GB इंटरनल स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. या सॅमसंग फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येऊ शकते. यासोबतच हा सॅमसंग फोन Android 12 वर आधारित One UI Core 4.1 स्किनवर चालतो. या सॅमसंग फोनमध्ये 6,000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

Samsung Galaxy M13 स्मार्टफोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यासोबतच फोनचा फ्रंट कॅमेरा 50MP आहे, ज्यामध्ये 50MP अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे. या सॅमसंग फोनमध्ये सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यासोबतच कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, 3.5mm ऑडिओ आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोनमध्ये 4G पेक्षा थोडा लहान 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरासाठी वॉटरड्रॉप नॉच आहे. या सॅमसंग फोनमध्ये MediaTek Dimensity 700 प्रोसेसर देण्यात आला आहे. सॅमसंग फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. हा सॅमसंग फोन Android 12 OS वर आधारित OneUI 4.0 कस्टम स्किनवर चालतो.

सॅमसंगच्या लेटेस्ट 5G स्मार्टफोनच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा फ्रंट कॅमेरा 50MP आहे. यासोबतच फोनमध्ये 2MP चा दुय्यम लेन्स देण्यात आला आहे. दुसरीकडे, सेल्फी कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. यासोबत कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS, 3.5mm ऑडिओ आणि USB टाइप C पोर्ट देण्यात आला आहे. या सॅमसंग फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 15W फास्ट चार्जिंग आहे.