file photo

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2021 :- शहरासह, उपनगर व नगर तालुक्यातून दुचाकी, चारचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरूच असून दोन दिवसामध्ये चार दुचाकी चोरीला गेल्या असल्याच्या फिर्यादी संबंधीत पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावरील चाँदबीबी महालाजवळून तेजस किशोर उगले (रा. जेऊर ता. नेवासा) याची दुचाकी रविवारी सायंकाळी चोरीला गेली.

उगले यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावेडीतील जाँगीक ट्रॅकच्यासमोरून रविवारी सायंंकाळी पंढरीनाथ निवृत्ती पालवे (रा. नागरदेवळे, भिंगार) यांची दुचाकी चोरीला गेली.

याप्रकरणी पालवे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सावेडीतील स्टेट बँक इंडियाच्या शाखेसमोरून सोमवारी दुपारी प्रवीण अंबादास कुलकर्णी (रा. सावेडी गाव) यांची दुचाकी चोरीला गेली.

याप्रकरणी कुलकर्णी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकी चोरीची चौथी घटना शेंडीबायपासच्या दत्तनगरमध्ये घडली.

रविवारी रात्री गुरूप्रसाद रामढोके कोरी (रा. एमआयडीसी, नागापूर) यांची दुचाकी रविवारी रात्री चोरीला गेली. याप्रकरणी कोरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर, उपनगर, नगर ग्रामीण भागातून दररोज तीन ते चार दुचाकी चोरीला जात असून पोलिसांकडून या गुन्ह्याचा योग्य तपास होत नसल्याचे दिसून येत आहे.

यामुळे वाढत्या दुचाकी, चारचाकी चोरीच्या घटनांना नागरिक वैतागले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.