There will be a big investment opportunity Flipkart's Sachin Bansal
There will be a big investment opportunity Flipkart's Sachin Bansal

Sachin Bansal : जर तुम्ही इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) मध्ये गुंतवणूक करून कमाई करणारे गुंतवणूकदार असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे.

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे (Flipkart) सह-संस्थापक सचिन बन्सल (Sachin Bansal) यांचा नवी टेक्नॉलॉजीजचा (Navi Technologies) IPO लॉन्च होणार आहे.

या IPO ला बाजार नियामक सेबी (SEBI) कडून मंजुरी मिळाली आहे. सचिन बन्सल यांच्या नेतृत्वाखालील फायनान्स फर्मने मार्चमध्ये 3,350 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी ऑफर डॉक्युमेंट दाखल केले होते.

काय आहे योजना

नवी टेक्नॉलॉजीजने आयपीओमधून मिळणारे पैसे कर्ज आणि विमा व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरण्याची योजना आखली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना वैयक्तिक, गृहकर्ज तसेच आरोग्य विम्यासाठी काम करते.

ICICI सिक्युरिटीज, BofA सिक्युरिटीज आणि Axis Capital, Credit Suisse Securities (India) Pvt Ltd आणि Edelweiss Financial Services हे पब्लिक इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

या फर्मचा नवी म्युच्युअल फंड मुख्यत्वे कमी किमतीच्या पॅसिव्ह फंड ऑफर करण्यावर केंद्रित आहे. सचिन बन्सल यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या कंपनीत सुमारे 4,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.