file photo

अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- आपल्या स्वयंपाक घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्यासाठी आरोग्यमय ठरू शकतात. आरोग्यासोबतच सौंदर्य खुलवण्याचं कामही अनेक घरगुती वस्तू करतात. लवंग त्यातीलच एक आहे. आपलं आरोग्य सांभाळणं अनेक अंशी आपल्याच हातात असतं.

आपण काही घरगुती उपाय केले तर आरोग्यासाठी फायदेशीरच ठरत असतात. लवंग अशी खाद्य वस्तू आहे ज्यामुळे आरोग्य उत्तम राखण्यास ती मदत करतेच शिवाय आपलं सौंदर्यही खुलवते. लवंगांचा वापर आपण मसाल्यात खूप वेळा केला असेल पण त्याचे अजूनही अनेक फायदे आहेत. ते आज आपण जाणून घेऊया…

पोटदुखीवर लाभदायक – गॅस, अपचन, ऍसिडिटी, कॉन्स्टिपेशन सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी लवंग खूप उपयुक्त ठरते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब टाकून ते पाणी प्यावे. यामुळे खूप आराम मिळे. जर आपण दररोज हा उपयोग केला तर वरील समस्या कायमस्वरूपी दूर होऊ शकतात.

चेहऱ्यावरील डाग दूर करणे – चेहऱ्यावरील डाग दूर करण्यात लवंग खूप फायदेशीर आहे. यासाठी लवंगची पावडर बनवून कोणत्याही फेस पॅकमध्ये किंवा बेसन आणि मधामध्ये मिसळून हा पॅक चेहऱ्यावर लावावा. त्यानं चेहरा स्वच्छ व निर्जंतूक होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा लवंगाची नुसती पावडर चेहऱ्याला लावू नका, ती खूप गरम होते. कोणत्याही फेसपॅकमध्ये मिसळूनच लवंग पावडरचा वापर करा.

सायनस – लवंगेचा आहारामध्ये समावेश केल्यास सायनस आणि नाकाच्या इतर तक्रारींपासून आराम मिळतो.

दातदुखीवर फायदेशीर – एक कापसाचा बोळा घेऊन त्यावर लंवंगाचे तेल घ्या आणि दुखत असलेल्या दातावर लावा.

तोंडाची दुर्गँधी – लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंधी दूर होते.

पोट साफ करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा – ज्यांचं पोट योग्यरित्या साफ होत नाही. त्यांनी रात्री झोपायच्या आधी 2 लवंगा चघळाव्यात. यामुळे पोट योग्य प्रकारे स्वच्छ होईल. लवंग रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचं कार्य करतं, ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

सौम्य तापावर फायदेशीर – सौम्य ताप असल्यास रात्री लवंगाच्या दुधाचं सेवन करून झोपा. सकाळी ताप पूर्णपणे बरा होईल.