Toyota CNG Car: भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता सीएनजी कार्ससाठी ग्राहकांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांचीही मागणी लक्षात ठेवता आता टोयोटाने देखील या सेगमेंटमध्ये दमदार एंट्री केली आहे.

कंपनीने आपली टोयोटा ग्लान्झा हॅचबॅक सीएनजी किटसह लॉन्च केली आहे. टोयोटा ग्लान्झा सीएनजी व्हर्जन एस आणि जी ग्रेडमध्ये देईल आणि फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन पॉवरट्रेनसह येईल. बाजारात ही दमदार कार लाँच झाल्याने ग्राहकांकडे आता आणखी एक जबरदस्त पर्याय उपलब्ध झाला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार टोयोटा ग्लान्झाची सुरुवातीची किंमत 8.43 लाख रुपये आहे (एक्स-शोरूम). टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 9.46 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.आम्ही तुम्हाला सांगतो कि मारुती सुझुकीच्या नवीन जनरेशनच्या बलेनो हॅचबॅकवर आधारित नवीन टोयोटा ग्लान्झा या वर्षाच्या सुरुवातीला लाँच करण्यात आली होती.

Toyota Urban Cruiser Hyryder CNG

टोयोटाने असेही जाहीर केले आहे की त्यांची नुकतीच लाँच केलेली फ्लॅगशिप SUV, अर्बन क्रूझर हायराइडर, S आणि G ग्रेडमध्ये फॅक्टरी फिट सीएनजी किटसह उपलब्ध असेल. महिनाभरापूर्वी लाँच झालेल्या एसयूव्हीच्या हायब्रिड व्हेरिएंटसह त्याची विक्री केली जाईल. तथापि, टोयोटाने अद्याप HyRyder च्या CNG व्हेरिएंटची किंमत उघड केलेली नाही.

मारुती सुझुकीच्या आक्रमक पध्दतीनंतर टोयोटाची सीएनजी सेगमेंटमध्ये एंट्री झाली आहे. मारुती सुझुकीकडे किमान 10 CNG प्रवासी कार आहेत आणि त्या विक्रीचे महत्त्वपूर्ण आकडे देतात. अतुल सूद, असोसिएट व्हाइस प्रेसिडेंट, सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंग, टोयोटा मोटर म्हणाले, “नवीनतम लाँचमुळे, आम्हाला खात्री आहे की आमच्या ग्राहकांना बाजारात निवडण्यासाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील, ज्यामुळे आमच्या ‘मोबिलिटी फॉर ऑल’ या तत्त्वज्ञानाचा पुनरुच्चार होईल. टोयोटा वाहनाच्या मालकीच्या आनंदासोबतच, आमच्या ग्राहकांना मालकीच्या कमी किमतीचा आणि टोयोटा वाहनांच्या पूर्ण ‘मन:शांती’चाही फायदा होईल, ज्यामुळे ‘सर्वांना सामूहिक आनंद’ मिळेल.

Glanza CNG चे मायलेज

Glanza CNG मॉडेल्स 1.2-लिटर K-Series पेट्रोल इंजिनसह सुसज्ज असतील जे स्टँडर्ड व्हेरियंटला सामर्थ्य देतात. नवीन ई-सीएनजी ग्लान्झा 77.5 पीएस कमाल पॉवर आणि 30.61 किमी/किलो मायलेज देईल.

Urban Cruiser Hyryder CNG मायलेज

Urban Cruiser Highrider ची CNG व्हर्जन1.5-लीटर K-सिरीज पेट्रोल इंजिनसह येईल, जी 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडली जाईल. ते 26.1 किमी प्रति किलोपर्यंत मायलेज देईल

हे पण वाचा :- 5G ची वाट पाहत आहात? नवीन अपडेट आले, आता ‘या’ यूजर्सना मिळणार सेवा