Maharashtra Havaman Alert : विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस; राज्यात यलो अलर्ट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Havaman Alert : राज्यात मान्सूनला अनुकूल वातावरण तयार झाले आहे. रविवारी दिवसभरात विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस पडला तसेच, मध्य महाराष्ट्र, कोकणातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, राज्यात यलो अलर्ट देण्यात आला असून ठिकठिकाणी मेघगर्जना 1 व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

वायव्य व पश्चिम, मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ५ सप्टेंबरनंतर संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. दरम्यान, एल निनोचा प्रभाव सुरू आहे.

तसेच, कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत आहे. रविवारी विदर्भातील वर्ध्यामध्ये ५१ तर नागपूरमध्ये ४५ मिमी. इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. तसेच, चंद्रपूर २७, ब्रह्मपुरी १०, गोंदिया ८ तसेच बुलढाणामध्येही ८ मिमी. पावसाची नोंद झाली. मराठवाड्यातील धाराशिवमध्ये २६ मिमी., नांदेड १८ तसेच परभणीमध्ये ०.१ मिमी. इतका पाऊस नोंदवला गेला.

मध्य महाराष्ट्रातही महाबळेश्वरमध्ये ८ मिमी., सोलापूर ३ तर कोल्हापूरमध्ये ०.१ मिमी. पाऊस पडला. कोकण भागातील मुंबईमध्ये ०.४ तर डहाणूमध्ये ०.४ मिमी. पाऊस पडला.

राज्यात यलो अलर्ट देण्यात आला असून येत्या ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान, कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार तसेच बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद झाली. मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, उर्वरित भागात पावसाची शक्यता आहे.