Maharashtra Rain: राज्यात ‘या’ कालावधीत अतिवृष्टीची शक्यता,या’ जिल्ह्यांना देण्यात आला आहे यलो अलर्ट, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain:-  राज्यामध्ये सगळीकडे सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश भागातील जनजीवनावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे. गुरुवारचा विचार केला तर राज्यामध्ये कोकण तसेच मुंबई व परिसरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली व  मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा व कोल्हापूर तसेच सातारा व विदर्भातील बऱ्याच भागांमध्ये देखील मुसळधार ते आति मुसळधार पाऊस बरसला.

परंतु त्या तुलनेत जर आपण पुणे शहराचा आणि परिसराचा विचार केला तर गुरुवारी त्या ठिकाणी दिवसभर पावसाने उघडीप दिलेली होती आणि घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर कमी झालेला बघायला मिळाला. उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडिसा किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात हा पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

 22 ते 24 जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टीची शक्यता

आज नाशिक तसेच मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली व विदर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून 22 ते 24 जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्राला येणाऱ्या चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसाचा विचार केला तर राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावून जनजीवन विस्कळीत केलेले आहे. तसेच येणाऱ्या 24 तासात पालघर, रायगड, ठाणे, सातारा आणि पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.

तसेच मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याशिवाय मराठवाड्यातील नांदेड तसेच लातूर व धाराशिव, परभणी, हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 राज्यात देण्यात आलेला अलर्ट

1- रेड अलर्टराज्यातील पालघर,ठाणे, मुंबई आणि रायगड या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे.

2- ऑरेंज अलर्टरत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसर व कोल्हापूर या परिसराला हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.

3- यलो अलर्ट राज्यातील नासिक, सिंधुदुर्ग, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड विदर्भातील अकोला,अमरावती,भंडारा,नागपूर, वर्धा, वासिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट दिलेला आहे.