शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ! मान्सूनच आगमन लांबल; आता ‘या’ तारखेला दाखल होणार केरळात, महाराष्ट्रात कधी? वाचा…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon 2023 : मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीमुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. खरंतर केरळमध्ये मान्सूनचे आगमन दरवर्षी एक जून ला होत असते.

एक जूनला केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले की तेथून पाच ते सहा दिवसात, अधिकाअधिक सात दिवसात मान्सून महाराष्ट्रात अर्थातच तळकोकणात दाखल होत असतो. मात्र यंदा 4 जून उजाडली आहे. तरीही मान्सूनचे केरळात आगमन झालेले नाही.

विशेष बाब म्हणजे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी भारतीय हवामान विभागाने आपल्या मान्सून अहवालात यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन 4 जूनला होणार असं स्पष्ट केलं होतं. मात्र यंदा भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाला निसर्गराजाने हुलकावणी दिली आहे. 

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील ‘या’ नवविवाहित जोडप्यांना मिळणार 50 हजाराचं प्रोत्साहन अनुदान ! पण…..

भारतीय हवामान विभागाचा अंदाज आता फोल ठरला असून मान्सूनचे केरळात अद्याप आगमन झालेले नाही. मात्र केरळात मान्सूनचे आगमन उद्या अर्थातच पाच जूनला होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आय एम डी ने 5 जून 2023 रोजी आता केरळात मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग, तसेच अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत मान्सून केव्हाच पोहचला आहे.

मात्र मान्सून पुढे सरकण्यास पोषक स्थिती नसल्यामुळे मान्सून ने त्या ठिकाणीच मुक्काम मांडला आहे. आता पुढील दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे केरळमध्ये मान्सून पाच जूनला दाखल होऊ शकतो असे सांगितलं जात आहे. 

हे पण वाचा :- कापसाच्या पंगा आणि कबड्डी वाणाला मिळतेय शेतकऱ्यांची पसंती ! वाणाच्या विशेषता पहा….

तसेच महाराष्ट्रात मान्सून आगमन 10-12 जूनच्या दरम्यान होणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत मान्सूनचे आगमन केरळमध्ये लांबले असले तरीदेखील महाराष्ट्रात मान्सून याआधी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच दहा जूनच्या सुमारास दाखल होण्याची शक्यता आहे.

निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बाब असली आहे. मात्र, मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान तयार झाले तेव्हाच मान्सूनचे महाराष्ट्रात निर्धारित वेळेत आगमन होईल अन्यथा राज्यातील मानसून आगमन देखील लांबण्याची शक्यता या निमित्ताने व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :- सोयाबीन पेरणी करण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी ! उगवण क्षमता कशी तपासणार ? पहा….