Ahmednagar News : मराठवाड्यात अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. कायमच दुष्काळी म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे.
गारपीट, अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यात नदी-नाले दुथडी भरून वाहात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
यात शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाले आहे. वडवणी, धारूर, माजलगाव तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला.
सुमारे एक ते दीड तास चाललेल्या पावसाने नद्या दुथडी झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या फळबागांसह पिकांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, आधीच दुष्काळाच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
आंबा पीक आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असून कांद्यासह पिकेही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे आता शेतकरी हतबल झाला असून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
अहमदनगरमध्ये ढगाळ वातावरण
अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने उष्णतेची तीव्रता कमी झाली होती. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही भागात ढगाळ वातावरण होते. गुरुवारी दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र,
पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात पाऊस झाला. शनिवारी संपूर्ण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज वारवण्यात आला आहे.
मोठे नुकसान
शेतात मेंढ्या राखणारी एक ६५ वर्षांच्या महिलेचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला, दुसऱ्या घटनेत वीज पडून बैलाचा जागीच मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे लाखों रुपये नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडून गेले असून झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे आता शेतकरी हतबल झाला असून नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.