Red Section Separator

आता तुमच्याकडे हिरो स्प्लेंडरची जुनी बाइक असेल तर तुम्ही ती इलेक्ट्रिक बनवू शकता.

Cream Section Separator

हिरो स्प्लेंडर बाईकसाठी हे इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट तयार करण्यात आले आहे.

इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट खरेदी करण्यासाठी तुम्हाला फक्त 37000 रुपये खर्च करावे लागतील.

मात्र, ही बाईक पूर्णपणे तयार करण्यासाठी सुमारे 60 हजारांचा खर्च येणार आहे. यात बॅटरी, किट आणि आरटीओच्या खर्चाचा समावेश असेल.

हे इलेक्ट्रिक मुंबई स्थित कंपनी GoGoA1 ने बनवले आहे. सध्या हे किट फक्त Hero Splendor बाईकसाठी बनवण्यात आले आहे, हे इलेक्ट्रिक कन्व्हर्जन किट हब मोटरला जोडलेले आहे.

कंपनीने या इलेक्ट्रिक किटसोबत रिजनरेटिव्ह कंट्रोलर, बॅटरी एसओसी, युनिव्हर्सल स्विच, ड्रम ब्रेक, थ्रॉटल, वायरिंग हार्नेस, कंट्रोल बॉक्स, डीसी ते डीसी कनेक्टर, स्विंग आर्म आणि अँटी थेफ्ट उपकरण दिले आहे.

हे हब मोटरशी जोडले जाऊ शकते, जे बाइकला उर्जा देईल. ही ब्रशलेस मोटर 2000W ची आहे, जी 63Nm जनरेट करण्यास सक्षम आहे.

इलेक्ट्रिक हिरो स्प्लेंडर बॅटरी किटमध्ये 72V 40AH लोथियम-आयन बॅटरी पॅक आणि चार्जिंगसाठी 72v 10amp चार्जर आहे.

आता सर्वकाही एकत्र घेतल्यास त्याची किंमत 55,606 रुपये असेल. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक 151 किमीची रेंज देईल.