प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असलेली बहुचर्चित आश्रम या वेब सिरींजचा तिसरा भाग रिलीज झाला आहे.
सध्या OTT प्लॅटफॉर्मवर हि वेब सिरीज प्रचंड धुमाकूळ घालत आहे.
मात्र या वेब सिरींजमधील कलाकारांनी किती मानधन घेतले आहे, याविषयी आपण जाणून घेऊ
बॉबी देओलने या वेब सीरिजमध्ये निराला बाबा निरालाची भूमिका साकारली असून त्याने प्रत्येक एपिसोडसाठी 1 ते 4 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
तिसर्या सीझनमध्ये ईशा गुप्ता पहिल्यांदाच पडद्यावर येत असून तिच्या बोल्डनेसला आणखी एक टच देणार आहे. तिने या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी 25 लाख ते 2 कोटी रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे.
त्रिधा चौधरीने वेब सीरिजमध्ये आपल्या भूमिकेतून सर्वांनाच चकित केले आहे. त्रिधा चौधरीने प्रत्येक एपिसोडसाठी 4 ते 10 लाख रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जात आहे.
काश्मीर फाईल्समधून सर्वांची मनं जिंकणारा दमदार अभिनेता दर्शन कुमार यावेळी पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. दर्शनने या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी 15 ते 25 लाख रुपये शुल्क आकारले आहे.
चंदन रॉय सन्याल उर्फभोपा हे बाबा निराला यांचे खास मित्रच नाहीत तर त्यांच्या सर्व कामात त्यांना साथ देतात. या भूमिकेसाठी चंदन रॉय सन्याल यांनी 15 ते 25 लाख रुपये फी घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
या वेब सीरिजमधील धाडक अभिनेत्री आदिती पोहोनकरने पम्मीची भूमिका सारकारली आहे. या भूमिकेसाठी तिने 12 ते 20 लाख रुपये घेतल्याचे सांगण्यात येत आहे.