Red Section Separator

लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज वाढदिवस आहे. नवाजुद्दीनने बरेच सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.नवाजुद्दीनने चित्रपटांत दमदार भूमिका साकारून चाहत्यांच्या मनात घर केलं.

Cream Section Separator

‘बजरंगी भाईजान’, ‘ठाकरे’, ‘मांझी’ या चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली.उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात नवाजुद्दीनचा जन्म झाला. नवाज लहान असताना त्याच्या घरी टीव्ही देखील नव्हता.

Red Section Separator

नवाजने १९९६ मध्ये दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले.नंतर अभिनेता होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने स्वप्ननगरी मुंबई गाठली.

करिअरच्या सुरुवातीला त्याने चित्रपटात वेटर, चोर यासारख्या छोट्या भूमिकाही साकारल्या आहेत.कधीकाळी वॉचमनची नोकरी केलेल्या नवाजुद्दीनकडे करोडोंची संपत्ती आहे.

Red Section Separator

नवाजुद्दीनने नुकतंच मुंबईत नवं घर घेतलं आहे.मीडिया रिपोर्टनुसार, नवाजुद्दीनचं वर्सोवा भागात देखील आलिशान फ्लॅट आहे.

याशिवाय नवाजुद्दीनकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन देखील आहे.‘मर्सिडीज’, ‘बीएमडब्ल्यू’, ‘ऑडी’ या महागड्या गाड्यांमधून नवाजुद्दीन फिरतो.