Red Section Separator

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या करिअरची सुरुवात काही वर्षांपूर्वीच केली आहे. मात्र तरीही ती नेहमीच चर्चेत असते.

Cream Section Separator

प्रोफेशनल लाईफसोबतच जान्हवी कपूरचे पर्सनल लाईफ देखील चर्चेत असते.

जान्हवी अजून कुणाला डेट करत नसली तरी तिने तिच्या बॅचलरेटपासून लग्नापर्यंतचा सगळा प्लॅन आधीच बनवला आहे.

जान्हवीने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला तिरुपतीमध्ये लग्न करायचे आहे आणि तो लग्न सोहळा अगदी साधा असेल.

जान्हवी म्हणाली होती की, तिच्या लग्नात तिला साधी सजावट हवी आहे. तिथे फक्त मोगऱ्याची फुले आणि मेणबत्त्या असाव्यात.

जान्हवीने तिच्या बॅचलरेटबद्दल सांगितले होते की, तिला एका बेटावरील यॉटवर सेलिब्रेट करायला नक्कीच आवडेल.

जान्हवीला दाक्षिणात्य गोष्टींची आवड असल्याने ती तिच्या लग्नात कांजीवरम सिल्कची साडी किंवा लांब स्कर्ट-टॉप आणि सोन्याची जरी परिधान करणार असल्याचे सांगितले होते.

जान्हवीने 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि 4 वर्षात तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला केंद्रित चित्रपट करण्यावर तिचा भर असतो.

जान्हवीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर ती 'मिली', 'मिस्टर अँड मिसेस माही' आणि 'बवाल' या आगामी सिनेमांमध्ये दिसणार आहे.