Red Section Separator

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'वाय' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाले आहे.

Cream Section Separator

या पोस्टरमध्ये मुक्ता बर्वे एका आक्रमक अंदाजात हातात मशाल घेऊन लढताना दिसत आहे.

Red Section Separator

'अंधाराच्या भीतीने मशाल का कधी विझत असते...? अस्तित्वाच्या या लढ्यात 'ती' येतेय... स्वतः मशाल होऊन...! वाय', असं कॅप्शन देत मुक्ताने तिच्या सोशल मीडियावरुन चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे.

या चित्रपटात मुक्ता बर्वे सोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक प्रथितयश कलाकार आहेत. मात्र सध्या तरी त्यांची नावे गुलदस्त्यात आहेत.

Red Section Separator

प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा हा थरारपट मराठीतील पहिलाच हायपरलिंक चित्रपट असेल.

कंट्रोल एन प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाची कथा अजित सुर्यकांत वाडीकर यांची असून पटकथा आणि संवाद अजित वाडीकर,स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत.

मागील काही महिन्यांपासून मराठी चित्रपटसृष्टीत एकाहून एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यातच  आता 'वाय' या चित्रपटाची भर पडणार आहे.

Red Section Separator

हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.