Red Section Separator

दीपा म्हणजेच रेश्मा शिंदेला ‘रंग माझावेगळा ’ या मालिकेत आई म्हणून प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

Cream Section Separator

'माझी तुझी रेशीमगाठ'मधल्या परीची गोड आई नेहा म्हणजेच प्रार्थना बेहेरेही भाव खाऊन जाते.

'आई कुठे काय करते'मुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सगळ्यांचीच Favourite झाली आहे.

'येऊ कशी तशी मी नांदायला'मधल्या स्वीटूच्या आईची दीप्ती केतकरांनी केलेली भूमिका लोकांना भावली.

आणि ओमची गोड आणि हळवी आई म्हणून शुभांगी गोखले यांना भरपूर प्रेम मिळालं.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतली माई अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी छान साकारली आहे.

नुकत्याच सुरू झालेल्या 'लेक माझी दुर्गा' या सीरियलमधल्या धैर्यवान आईच्या रूपात हेमांगी कवी दिसत आहे.

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत अदिती देशपांडे यांनी साकारलेली जीजी अक्का फारच रुबाबदार आहे.

प्रत्येक मालिकेतल्या मुख्य पात्रांसोबत आईच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

कारण आईच्या मायेची ऊब हा प्रत्येकाच्या भावनेला थेट हात घालणारा विषय आहे.