शेवगाव तालुक्यात सोमवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांचे अतोनात नुकसान

पाणी गावागावात घुसल्याने गावातील जनावरे, वाहने वाहून गेली आखेगाव, भगूर, वडुले गावात पुराचे पाणी शिरले आहे. काही नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले

तालुक्यातील शेवगाव महसूल मंडळात  24 तासात 85.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अन्य महसूल मंडळात  पावसाचा जोर कायम असल्याने  तालुक्यातील बहुतांश नद्यांनी  धोक्याची पातळी ओलांडली आहे.

आमदार मोनिका राजळे यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून तहसीलदार अर्चना पागिरे, गट विकास अधिकारी महेश डोके हे पूरग्रस्त गावांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

तालुका प्रशासनाने येत्या चोवीस तासात पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.