Red Section Separator

रक्षाबंधन : 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने जवळपास 40 कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाच्या बजेटनुसार तो फ्लॉप मानला जात आहे.

Cream Section Separator

सम्राट पृथ्वीराज : या चित्रपटाने केवळ 68 कोटींचा व्यवसाय केला. बजेटनुसार हा चित्रपट फ्लॉप ठरला.

बच्चन पांडे : 2022 च्या सुरुवातीला आलेल्या या चित्रपटाने जवळपास 50 कोटींची कमाई केली होती. त्याचे बजेट 180 कोटी असल्याचे सांगितले जात आहे.

सूर्यवंशी : 2021 मध्ये आलेला हा चित्रपट अॅक्शन पॅक्ड ड्रामा होता. या चित्रपटाचे कलेक्शन 196 कोटी होते. हा चित्रपट हिट ठरला होता.

बेल बॉटम : ऑगस्ट 2021 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सुमारे 30 कोटींची कमाई केली होती, तर त्याचे बजेट 70 कोटी असल्याचे सांगण्यात आले.

गुडन्यूज : 2019 मध्ये आलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. चित्रपटाचे एकूण बजेट 85 कोटी होते, तर त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 205 कोटी होते.

हाऊसफुल्ल- 4 : हा चित्रपट हिट झाला आणि त्याचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 194 कोटी इतके होते.

मिशन मंगल : या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 203 कोटी होते आणि हा अक्षय कुमारचा 2019 मधील पहिला सुपरहिट चित्रपट होता.

केसरी : 2019 मध्ये आलेला केसरी देखील सुपरहिट ठरला होता, या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जवळपास 154 कोटी होते.