Red Section Separator

अभिनेता अक्षय कुमार पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सर्वाधिक आयकर भरणारा सेलिब्रिटी बनला आहे. अक्षयला आयकर विभागाने 'सन्मान पत्र'ही दिले आहे.

Cream Section Separator

अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड स्टार आहे जो दरवर्षी सहा ते सात सिनेमे करतो.

त्याचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच तो दुसऱ्या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करतो.

पण सध्या अक्षय त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळं चर्चेत आहे. त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फार काही चांगली कमाई केली नाही.

अक्षय त्याच्या चित्रपटांसोबतच आणखी एका मुद्द्यामुळं चर्चेत असतो, तो मुद्दा म्हणजे, नागरिकत्व.

नागरिकत्वाच्या मुद्यावरून तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतो.

देशभक्तीवर आधारीत चित्रपट करणाऱ्या अक्षय कुमारवर कॅनडाचा नागरिक असल्याच्या मुद्यावर बरेचजण टीका करतात.

खुद्द अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व का स्वीकारले याचा खुलासा केला आहे.

एका कार्यक्रमात अक्षय कुमारनं सांगितलं की, काही परिस्थितीमध्ये त्याला कॅनडाचं नागरिकत्व स्वीकारावं लागलं होतं.

त्याचे सलग १४ चित्रपट फ्लॉप झाले होते. त्यामुळं करिअर संपलं असून आता आयुष्य जगण्यासाठी आणखी काही वेगळी कामे करावी लागणार असल्याचं वाटत होतं.

नागरिकत्वावर वाद सुरू झाल्यानंतर भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला असल्याची माहिती अक्षय कुमारने दिली.