Red Section Separator

छोट्या पडद्यावरील ‘भाभीजी घर पर’ या मालिकेतील ‘अंगूरी भाभी’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिला आज कोणत्या परिचयाची गरज नाही.

Cream Section Separator

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकणारी अभिनेत्री शिल्पा शिंदेने वयाचे 45 वर्ष पूर्ण केली आहेत.

‘भाभीजी घर पर है ’ या मालिकेतील ‘अंगूरी भाभी’च्या भूमिकेमुळे तिला प्रत्येक जण ओळखत आहे.

शिल्पा शिंदे वयाच्या 45 व्या वर्षी सिंगल असली तरी ती लग्न करणार होती.

मात्र, शेवटच्या क्षणी तिने आपलं लग्न मोडून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

शिल्पा ही तिचा को-स्टार रोमित राजच्या प्रेमात होती आणि दोघेही लग्न करणार होते.

रोमित राज आणि शिल्पा शिंदे यांनी ‘मायका’ या मालिकेत एकत्र काम केले होते.

दोघांच्या लग्नाची गोव्यात 29 नोव्हेंबर 2009 ही तारीख ठरली होती, पण नंतर असं काही घडलं की हे नातं तुटलं?

लग्न मोडल्याच्या 7 वर्षानंतर म्हणजेच 2016 मध्ये एका मुलाखती दरम्यान शिल्पाने लग्न मोडल्या मागचं कारण स्पष्ट केलं.

करवा चौथच्या दोन दिवस आधी तिला समजले की रोमित हा अॅडजस्ट करणारा नवरा सिद्ध होऊ शकत नसल्यानं तिने लग्न मोडलं.