आजच्या तंत्रज्ञांनाच्या युगात डिजिटल व्यवहारांना प्राधान्य दिले जाते. यातच आर्थिक व्यवहारासाठी ATM चा मोठा वापर केला जातो.
पैसे काढण्यासाठी तुम्हाला नेहमी ATM पिन टाकावा लागतो. मात्र एटीएमचा हा पिन 4आकडी का असतो, याचे कारण आपण जाणून घेऊ..
पिन हे एकमेव सुरक्षा साधन आहे जे तुमचे पैसे सुरक्षित करते. साधारणपणे हा पिन 4 अंकांचा असतो.
पूर्वी हा पिन 4 अंकांसाठी नसून 6 अंकांसाठी ठेवला जात होता. पण जेव्हा ते वापरात आणले गेले तेव्हा लोक साधारणपणे फक्त 4 अंकी पिन लक्षात ठेवू शकतात असे लक्षात आले.
त्याचबरोबर 6 अंकी पिनमध्ये लोकांची गैरसोय होऊ लागली आणि त्यामुळे एटीएमचा वापर कमी होऊ लागला. त्यामुळे मग एटीएमचा पिन 4 अंकी ठेवण्यात येऊ लागला.
या प्रयोगानंतर एटीएमचा पिन 4 अंकी करण्यात आला. पण तरीही सत्य हे आहे की 4 अंकी एटीएम पिनपेक्षा 6 अंकी पिन अधिक सुरक्षित आहे.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की 4-अंकी पिन 0000 ते 9999 पर्यंत आहे. यासह, 10000 भिन्न पिन नंबर ठेवता येतात, ज्यामध्ये 20 टक्के पिन हॅक केले जाऊ शकतात.
परंतु 4 अंकी पिन हा 6 अंकी पिनपेक्षा थोडा कमी सुरक्षित आहे. आजही अनेक देश फक्त 6 अंकी एटीएम पिन वापरतात.