विविध कंपन्यांनी कार विक्रीच्या बाबतीत चांगली कामगिरी केलेली दिसून येत आहे.
यामध्ये प्रामुख्याने मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई अशा कंपन्यांनी चांगली कामगिरी केल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
मारुती सुझुकी : मारुती सुझुकीने या वेळीही देशात सर्वाधिक कार विक्री करत आपले पहिले स्थान अबाधित ठेवले आहे. मे 2022 मध्ये कंपनीने एकूण 124474 युनिट विकून भारतात पहिला क्रमांक मिळविला आहे.
टाटा मोटर्स : टाटा मोटर्सने या वेळी चांगली कामगिरी केली आहे. मे 2022 मध्ये टाटा मोटर्सने 43341 कारची विक्री करुन 185.50 टक्के ग्रोथ मिळविली आहे.
ह्युंदाई : कंपनीने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली कामगिरी केली आहे. परंतु असे असतानाही मे 2022 मध्ये 42294 युनिट विकूनही कंपनी दुसर्या क्रमांकावरुन घसरुन तिसऱ्या स्थानावर पोहचली आहे.
महिंद्रा : मे 2022 मध्ये 26904 युनिटची विक्री करुन महिंद्राने चौथा क्रमांक मिळविला आहे. कंपनीने मे 2021 मध्ये केवळ 8004 युनिटची विक्री केली होती.
किआ : किआ कंपनीने मे 2022 मध्ये 18718 कार्सची विक्री करुन भारतात पाचवा क्रमांक मिळविला आहे. मे 2021 मध्ये कंपनीने केवळ 11050 युनिट्सची विक्री केली होती.
एकंदरीतच वाहन विक्रीच्या आकडेवारीतून हे स्पष्ट होते कि मारुती सुझुकी कंपनीच्याच्या वाहनांकडे ग्राहकांचा कल जास्त आहे.