गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असताना आम्ही तुमच्यासाठी एक दिलासादायक माहिती घेऊन आलो आहे.

अनेकजण महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोन सिलेंडर बुक करतात.

सिलेंडर बुक करण्याची प्रोसेस प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी कॉलच्या माध्यमातून बुकिंग करते, तर कोणी अ‍ॅपवरून बुकिंग करते.

तुम्ही Paytm च्या माध्यमातून सिलेंडर बुकिंग करून कॅशबॅकचा फायदा घेऊ शकता.कस ते जाणून घ्या

गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी सर्वात प्रथम Paytm अ‍ॅप ओपन करा. Book gas Cylinder या पर्यायावर क्लिक करा आता तुम्ही तुमचा गॅस प्रोव्हाइडरची निवड करा पुढे तुम्हाला तुमचा एलपीजी आयडी अथवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकावा लागेल. आता Proceed या पर्यायावर टॅप करा.

त्यानंतर खाली Apply Promocode चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला FIRSTGAS कोड टाकायचा आहे.

प्रोमोकोडद्वारे तुम्हाला ५० रुपयांपासून ते १ हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. प्रोमोकोड टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला कॅशबॅक मिळेल.

मात्र, लक्षात ठेवा की, पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदाच गॅस सिलेंडर बुक करत असाल तरच कॅशबॅकचा फायदा होईल. हा प्रोमोकोड तेव्हाच लागू होईल.