Red Section Separator

धावपळीच्या युगात आजकाल स्वस्थ बिघडणे हे नित्यनियमाचे झाले आहे. यामुळे तुम्हाला दवाखान्याच्या खेट्या माराव्या लागतात.

Cream Section Separator

मात्र तुम्हीं घरात असे काही वनौषधीं झाडे लावू शकता ज्याच्या साह्याने तुम्ही हॉस्पिटलच्या चक्र मारणे सहज थांबवू शकता.

घरी अतिशय सोप्या पद्धतीने वाढवू शकता अशी आयुर्वेदिक रोपे आपण जाणून घेऊ

कडुलिंब : यामुळे आपले शरीर थंड राहते तसेच पचन सुधारते. थकवा दूर करतो. जखमा स्वच्छ आणि बरे करण्याचे कार्य करते. त्वचेशी संबंधित आजारांवर फायदेशीर. मधुमेहात उपयुक्त.

ओव्याची पाने : याच्या सेवनाने  पचन सुधारते. भूक सुधारते. पोटातील जंतांची समस्या दूर करते. तापामध्ये फायदेशीर ठरते तसेच  खोकल्याच्या समस्येवर उपयुक्त आहे. डोकेदुखीमध्ये आराम देते.

तुळस ; खोकल्याच्या समस्येवर उपयुक्त. पोटातील जंतांची समस्या दूर करते. भूक आणि चव सुधारते. पचनशक्ती सुधारते. दमा आणि श्वसनाच्या आजारात आराम मिळतो. त्वचेशी संबंधित आजारांवर फायदेशीर.

एलोविरा : भाजल्यावर आराम मिळतो. जखम भरते. शरीर थंड ठेवते. पोटाशी संबंधित समस्यांवर फायदेशीर. मासिक पाळीच्या वेदनांवर प्रभावी. यकृत कार्य सुधारते. बद्धकोष्ठता, आम्लपित्त आणि जडपणापासून आराम मिळतो.

या आयुर्वेदिक वनस्पती केवळ शरीरातील दोष दूर करत नाहीत तर वातावरणही स्वच्छ करतात.