दुचाकी क्षेत्रात नवीनवीन बाईक लॉन्च करणारी तसेच अग्रेसर असलेली बजाज कंपनी दुचाकीधारकांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आली आहे.
प्रीमिअम सेगमेंटच्या बाइक बनविणारी कंपनी ट्राइंफने बजाजसोबत पार्टनरशिप केली आहे.
याअंतर्गत आता मीडिअम सेगमेंटच्या प्रीमिअम बाइक लाँच करण्यात येणार आहे.
बजाज आणि ट्राइंफ मिळून एक नवीन प्रोडक्टवर काम करीत आहेत.
या नवीन बाईकचा लूक अतिशय दमदार तयार करण्यात आला आहे.
ट्राइंफची ही अपकमिंग बाइक, कपंनीच्या आयकॉनिक बोनेविले फॅमिलीचाच एक भाग असणार आहे.
या अपममिंग बाइकमध्ये 19 इंचाचा फ्रंट व्हील दाखविण्यात आले आहे. तर रियरवर 17 इंचाचे व्हील दिसून येत आहे. यात फूट पेग्स आणि हेंड्स गार्डदेखील देण्यात आले आहेत.
बजाज-ट्राइंफची ही बाइक 350 सीसीच्या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी तयार आहे.
सध्या या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डचा दबदबा बघायला मिळत आहे. 350 सीसीच्या सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्ड क्लासिक आणि त्याच्या दुसर्या बाइक्सचे चांगले मार्केट शेअर्स आहेत.
बजाज-ट्राइंफची अपकमिंग बाइक मीडिअम सेगमेंटची बाइक असणार आहे. ही एक सिंगल सिलेंडर प्रीमिअम बाइक असणार आहे.
कमी किमतीत दमदार बाइक निर्माण करण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे.