Red Section Separator

तुम्ही जर मुदत ठेव (FD) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे.

Cream Section Separator

अनेक मोठ्या बँकांनी 'आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत आकर्षक एफडी योजना सुरू केल्या आहेत.

यामध्ये प्रामुख्याने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ बडोदा, Axis बँक आणि कर्नाटक बँक यांचा समावेश आहे.

जे त्यांच्या ग्राहकांना मर्यादित कालावधीत FD वर सर्वाधिक व्याजदर देत आहेत.

SBI : बँकेने नुकतीच उत्सव ठेव नावाची नवीन मुदत ठेव योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, SBI मुदत ठेवींच्या ठेवीदारांना 6.1% व्याज देईल.

कर्नाटक बँके : या बँकेनं 'KBL अमृत समृद्धी योजना' सुरू केली. बँक आपल्या ग्राहकांना 75 आठवडे किंवा 525 दिवसांच्या FD वर 6.10 टक्के व्याज देईल.

बँक ऑफ बडोदा : या बॅंकेने ची 'बडोदा तिरंगा ठेव योजना' सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, 444 दिवसांच्या मुदतीवर 5.75 टक्के आणि 555 दिवसांच्या कालावधीसाठी 6% व्याज मिळेल.

अॅक्सिस बँक : अॅक्सिस बँकेने विशेष एफडी योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत, बँक 75 आठवड्यांसाठी केलेल्या FD वर 6.05% व्याज देईल.