कडूलिंबात असणाऱ्या विविध औषधी गुणधर्मामुळे कडुलिंबाच्या झाडाला सर्वात जास्त महत्व आहे.
चला तर मग आज आपण कडुलिंबाच्या झाडाचे काही आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ
कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्यामुळे जर कडुलिंबाची सालं,पाने आणि फळं या सर्वांची पेस्ट करून जर चेहऱ्यावर लावली तर चेहऱ्यावर येणारे फोड, पुरळ यापासून मुक्तता मिळते.
कानामध्ये कडुलिंबाचे तेल टाकले असता कान दुखणे किंवा कानातून पाणी येणे हे सर्व आजार बरे होतात.
कडुलिंब दातांसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. रोज कडुलिंबाच्या काडीने दात घासले असता दात स्वच्छ आणि निरोगी राहतात.
पित्ताशयाच्या आजारावर सुद्धा कडुलिंबाचा रस उपायकारी आहे . एवढ्या सर्व आजारावर एकट्या कडुलिबांच्या रसापासून मुक्तता मिळते.
हृदय रोगात कडूलिंब रामबाण ठरू शकतो. जर आपल्याला हृदयरोगाची भीती असेल तर कडूलिंबाची पानांच्या ऐवजी कडूलिंबाच्या तेलाचं सेवन करावं.
शिळं अन्न खाल्ल्यानं उलट्या होते, पित्त वाढतं यासाठी कडूलिंबाची साल, सूंठ, मिरेपूड आणि आठ-दहा ग्राम सकाळी आणि संध्याकाळी पाण्यासोबत घ्यावं. तीन-चार दिवसांत पोट साफ होईल.
कडूलिंबाच्या पानात थोडं हिंग मिसळून चाटण घ्यावं, पोटातील किडे नष्ट होतात.