भारतातील दोन सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल लवकरच 5G लॉन्च करणार आहेत.
भारतात 5G लाँच होण्यापूर्वीच अनेक कंपन्यांचे मोबाईल विकले जात आहेत जे 5G बँडला सपोर्ट करतात.
यातील सर्वोत्तम मोबाईल फोन्सची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. त्यांची किंमत 20-30 हजार रुपये आहे.
OnePlus Nord 2T 5G : या फोनची घोषणा या वर्षी मे मध्ये करण्यात आली होती. रु.30 हजारांखालील हा सर्वोत्तम 5G मोबाईल फोन आहे. त्याची किंमत 28,999 रुपये आहे.
Oppo Reno 8 : हा फोन या वर्षी जुलैमध्ये रिलीज झाला होता. फोनची किंमत 29,999 रुपयांपासून सुरू होते.
Motorola Edge 30 : या फोन एक चांगला मध्यम श्रेणीचा स्मार्टफोन आहे. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे.
Samsung Galaxy A52s 5G : यात फोनमध्ये 6.5-इंच स्क्रीन आहे. Galaxy A52S चे बेस व्हेरिएंट 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येते. त्याची किंमत 27,999 रुपये आहे.
xiaomi 11i हायपरचार्ज : Xiaomi 11i हायपरचार्ज या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झाला होता. कंपनीचा दावा आहे की फोन फक्त 15 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होतो.
Poco F4 : हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर चालतो. फोनचा बेस व्हेरिएंट 6GB जॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. त्याची किंमत 27,999 रुपये आहे.