Red Section Separator

सध्या सुट्ट्यांचा काळ सुरु असून आपणही फॅमिलीसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही सुंदर हिल स्टेशनबाबत माहिती देणार आहोत.

Cream Section Separator

तवांग, अरुणाचल प्रदेश:- तवांग हे देशातील सर्वात स्वच्छ हिल स्टेशनपैकी एक आहे, जे सुमारे 3040 मीटर उंचीवर आहे.

सुंदर मठ :- तवांग हे अनेक महत्त्वाच्या आणि सुंदर मठांसाठी ओळखले जाते, हे हिल स्टेशन 6 व्या दलाई लामा, त्सांगयांग ग्यात्सो यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.

कौसानी, उत्तराखंड:- कौसानी येथील हिमालयाच्या सुंदर दृश्यात त्रिशूल, नंदा देवी आणि पांचुली शिखरे अतिशय विलोभनीय दिसतात.

प्रसिद्ध ट्रॅक :- कौसानी येथे हिवाळ्याच्या महिन्यांत बर्फवृष्टी होते, येथे कैलास ट्रेक, बेस कौसानी ट्रेक आणि बागेश्वर-सुंदर धुंडा ट्रेक हे येथील काही लोकप्रिय ट्रेक आहेत.

कुन्नूर, तामिळनाडू :- तीन सुंदर निलगिरी हिल स्टेशनपैकी एक, कुन्नूर हे पश्चिम घाटातील दुसरे सर्वात मोठे हिल स्टेशन आहे.

हाफलांग, आसाम :- आसाम राज्य हाफलॉन्ग या एकमेव हिल स्टेशनसाठी ओळखले जाते, ज्यामध्ये हाफलांग हिल आणि हाफलांग सरोवर यांसह अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Red Section Separator

इडुक्की, केरळ :- इडुक्की हा केरळमधील निसर्गसंपन्न प्रदेशांपैकी एक आहे, त्याच्या अर्ध्याहून अधिक क्षेत्रफळ जंगलांनी व्यापलेले आहे.