Red Section Separator

बीएमडब्ल्यूने देशात BMW 6 सिरीजमधील नवीन विशेष 50 Jahre M Edition लाँच करण्याची घोषणा केली.

Cream Section Separator

दिल्लीमध्ये या कारची सुरुवातीची एक्सशोरूम किंमत 72 लाख 90 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर नवीन बीएमडब्ल्यूचे बुकिंग देखील ऑनलाइन सुरू झाले आहे.

ही कार बीएमडब्ल्यू ट्विनपॉवर टर्बो तंत्रज्ञानासह उपलब्ध होणार आहे.

कारमध्ये 2 लिटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे ज्याच्या माध्यमातून 258 hp ची कमाल पॉवर आणि 400 Nm चा पीक टॉर्क जनरेट होणार आहे.

ही कार केवळ 6.5 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग धारण करते.

कारमध्ये मल्टीपल एअरबॅग्ज, कॉर्नरिंग ब्रेक कंट्रोल, ABS विथ ब्रेक असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल आदी फीचर्स आहेत.

कारमध्ये मोबाईल फोन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto साठी वायरलेस चार्जिंग मिळते.

नवीन लिमिटेड एडिशन मॉडेल विविध रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टांझानाइट ब्लू मेटॅलिक, एम कार्बन ब्लॅक, बर्निना ग्रे अंबर इफेक्ट आणि मिनरल व्हाइट, कॉग्नाक फिनिशमध्ये कॉन्ट्रास्ट स्टिचिंग विथ नॅचरल लेदर डकोटा अपहोल्स्ट्रीसह पेअर करण्यात आले आहे.