Red Section Separator

आज स्वबळावर बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे काही कलाकार हे एकेकाळी टीव्हीसाठी अँकरिंगचं काम करायचे.

Cream Section Separator

नेमके कोण आहेत 'हे' कलाकार जाणून घेऊ ...

Red Section Separator

आयुष्मान खुराना : अभिनेता आयुष्मान खुराना रोडीज विनर झाल्यानंतर बराच चर्चेत आला होता. त्यानंतर त्याने टीव्ही शो होस्ट, आयपीएलसाठी अँकरिंगही केलं. आज आयुष्मान बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.

अपारशक्ती खुराना : अपारशक्ती खुरानाने देखील बऱ्याच टीव्ही शोसाठी अँकरिंग केलं आहे. त्यानंतर त्यानं काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारूनही बरीच प्रसिद्धी मिळवली आहे.

Red Section Separator

रणविजय : अनेक वर्ष रोडीज हा लोकप्रिय शो होस्ट करणारा अभिनेता रणविजय आतापर्यंत दोन चित्रपटांमध्ये दिसला आहे. त्याचे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरलेत.

गौरव कपूर : गौरव कपूर हा टीव्ही जगतातील प्रसिद्ध होस्ट आहे. टीव्ही अँकरिंगमध्ये प्रसिद्धी आणि नाव कमावणाऱ्या गौरव कपूरची अभिनय कारकिर्द मात्र फ्लॉप ठरली.

सोफी चौधरी : एमटीव्हीची होस्ट सोफी चौधरीनं देखील नंतर चित्रपटसृष्टीत आपलं करिअर करण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे चित्रपट फारसे चालले नाहीत.

Red Section Separator

पूरब कोहली : पूरब एकेकाळचा टीव्ही जगतातील अँकरिंगमधील आघाडीचा होस्ट होता. त्याने नंतर चित्रपटांमध्येही काम केलं. त्याचे काही चित्रपट हीट झाले.

मनिष पॉल : मनिष पॉल एक उत्तम अँकर मानला जातो. ‘संडे टँगो’ या शोमुळे तो चर्चेत आला होता. चित्रपटांमध्ये मनिष फार यशस्वी ठरला नाही.