आज देश विदेशात बॉलिवूड अभिनेता सलमान खान या चांगलाच लोकप्रिय आहे. पण त्याच्या चाहत्यांसाठी आज धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गायक मुसावाला पाठोपाठ आता बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याला अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
मात्र एकट्या सलमानलाच ही धमकी मिळाली नसून यापूर्वी देखील अनेक अभिनेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
बॉलिवूडमधील असे कोण कलाकार आहे ज्यांना गॅंगस्टरकडून जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली आहे. ते आपण जाणून घेऊ.
अमिताभ बच्चन : 2010 मध्ये अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉगरविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. ब्लॉगरने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप होता.
अक्षय कुमार : अक्षय कुमारला गुंड रवी पुजारा याने जीवे मारण्याची धमकी दिली होती. एका व्यक्तीने अक्षयला फोन केला आणि स्वतःला रवी पुजारा म्हटले होते.
सलमान खान : सलमान खानला फेसबुकवर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पोस्टमध्ये सलमान खानच्या फोटोवर लाल क्रॉसचे चिन्ह होते.
आमिर खान : आमिर खानला त्याच्या ‘सत्यमेव जयते’ या शोच्या पहिल्या सीझनमध्ये जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. त्याच्या सुरक्षेसाठी आमिरने एक बॉम्ब / बुलेटप्रूफ कार खरेदी केली होती.
कंगना रनौत : 2007 मध्ये एका स्टॉकरने कंगना राणौतची बहीण रंगोलीवर अॅसिड फेकले होते. कंगनाला त्याच व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर कंगनाने पोलिसांकडे तक्रार केली होती.
स्वरा भास्कर : स्वरा भास्करला तिच्या ‘अनारकली ऑफ आराह’ चित्रपटाच्या रिलीज दरम्यान धमक्या आल्या होत्या. स्वराला सोशल मीडियावर दोन ते तीन धमक्या आल्या होत्या.
मल्लिका शेरावत : मल्लिका शेरावतलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मल्लिकाने भंवरी देवीच्या जीवनावर आधारित चित्रपट करण्याचा खुलासा केला तेव्हा हे घडले होते.