Red Section Separator

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांना भारीच आवडला होता.

Cream Section Separator

आता या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नुकतीच या चित्रपटाच्या रिलीजची डेट जाहीर करण्यात आली आहे.

अभिषेक पाठक दिग्दर्शित ‘दृश्यम 2’ हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.

या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता यांच्या दमदार भूमिका दिसणार आहेत.

चित्रपटाची संपूर्ण टीम आज हैदराबादमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे.

‘दृश्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन 7 वर्ष झाली आहेत. तब्बल 7 वर्षानंतर या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'दृश्यम 2'चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे.