Red Section Separator

बॉलिवडूचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट 'पृथ्वीराज'चं नाव बदलण्यात आलं आहे.

Cream Section Separator

नाव बदलल्यानंतर आता नवं नाव 'सम्राट पृथ्वीराज' असं असणार आहे.

Red Section Separator

करणी सेनेनं कोर्टात धाव घेतल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदललं आहे.

श्री राजपूत करणी सेनेनं या चित्रपटाच्या नावाविरोधात कोर्टात धाव घेत जनहित याचिका दाखल केली होती.

Red Section Separator

चित्रपटाचे निर्माते यशराज फिल्म्सनं राजपूत समाजाच्या भावाना आणि मागणीचा विचार करता चित्रपटाचं नाव पृ्थ्वीराज वरुन सम्राट पृथ्वीराज असा बदल केला.

या चित्रपटातून सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारली जात आहे.

पृथ्वीराज चौहान यांनी शौर्याने युद्धे कशी जिंकली आणि दिल्लीची सुल्तानी कशी मिळवली हे दाखवण्यात आले आहे.

पृथ्वीराज या चित्रपटात पृथ्वीराज चौहानच्या भूमिकेत अक्षय कुमार दिसत आहे.

तसेच या चित्रपटाद्वारे २०१७ ची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Red Section Separator

येत्या ३ जून २०२२ रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.