Red Section Separator

आपल्या निरोगी आरोग्यासाठी डाळ महत्त्वाची आहे, त्यामुळे डाळीचा समावेश हा आहारात असायलाच पाहिजे.

Cream Section Separator

तुम्ही जर तुमच्या आहारात मूग डाळीचा समावेश केला तर तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतेच त्याचबरोबर पचनक्रियाही सुधारते.

डेंग्यूचा आजार असो किंवा सामान्य ताप असो, मूग डाळीचे सेवन अत्यंत फायदेशीर मानले जाते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मूग डाळीचे सेवन खूप फायदेशीर आहे.

मूग डाळ हे अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. यामध्ये ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ई’ जीवनसत्त्वे  मुबलक प्रमाणात असतात.

यासोबतच यामध्ये भरपूर पोटॅशियम, लोह, कॅल्शियम मॅग्नेशियम, कॉपर, फोलेट, फायबर असते, त्यामुळे मूग डाळ शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करते.

मूग डाळीच्या सेवनाने ऊर्जा मिळते. मूग डाळीमध्ये लोह, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि प्रोटीन असते. हे घटक शरीरातील कमजोरी दूर करतात.

मूग डाळीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. तुम्ही ते स्प्राउट्सच्या स्वरूपात खाऊ शकता.

मूग डाळ पचनक्रिया सुधारते. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पचन चांगले राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात मूग डाळीचा समावेश करू शकता. मुगाच्या डाळीनेही पोटाची उष्णता दूर करता येते.

मूग डाळीचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत होते.