देशात इंधनाचे वाढते दार पाहता ग्राहक इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांकडे वाळू लागले आहे.
सध्या बाजारात फॅक्टरी फिटेड सीएनजी गाड्यांना मोठी डिमांड आहे. त्यामुळेच प्रमुख वाहन उत्पादक कंपन्या आता सीएनजी कार्स लाँच करू लागल्या आहेत.
सध्या बाजारात अनेक सीएनजी कार उपलब्ध आहेत तसेच काही कंपन्या नवीन सीएनजी मॉडेल्स सादर करणार आहेत.
चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या सीएनजी कार लॉन्च होणार आहेत.
मारुती सुझुकी बलेनो : मारुती सुझुकी कंपनी लवकरच अपडेटेड बलेनो कारचं नवीन व्हर्जन लाँच करणार आहे. हे बलेनोचं सीएनजी व्हर्जन असेल. हि कार प्रति किलो ३० किलोमीटरचं मायलेज देऊ शकते.
मारुती सुझुकी स्विफ्ट : मारुतीची स्विफ्ट ही देशात सर्वात जास्त विकली जाणारी हॅचबॅक कार आहे. आता कंपनी स्विफ्टचं सीएनजी मॉडेल आणणार आहे.
मारुती सुझुकी विटारा ब्रेझा : कॉम्पॅक्ट एसयूव्हींच्या सेगमेंटमध्ये ही कार सर्वाधिक विकली जाणारी दुसऱ्या क्रमांकाची कार आहे. डिझेल इंजिनसह उपलब्ध असलेली हि कार सीएनजी व्हेरिएंटमध्ये लॉन्च होऊ शकते.
टाटा अल्ट्रॉझ : टाटा मोटर्स कंपनी त्यांची सीएनजीवर चालणारी अल्ट्रॉझ ही कार लॉन्च करू शकते. Altroz CNG चं टेस्टिंग नुकतंच पूर्ण झालं आहे.