देशात परवडणाऱ्या आणि कमी बजेटच्या SUV ला आल्यापासून लोकांनी हॅचबॅकपासून कॉम्पॅक्ट सेडान कारकडे पाहणे बंद केले आहे.
यामुळेच गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही सेगमेंटमध्ये (SUV segment) सातत्याने वाढ होत आहे.
कमी किमतीत, तुम्हाला उत्तम स्पेस, हाई सीटिंग पोजीशन आणि बेस्ट रोड विसिबिलिटी देणारे वाहन मिळते.
आम्ही तुम्हाला मागच्या महिन्यात टॉप 3 सर्वाधिक विकल्या गेलेल्या कॉम्पॅक्ट SUV बद्दल माहिती देत आहोत.
Maruti Suzuki Brezza : सप्टेंबर महिन्यात कंपनीने 15,445 मोटारींची विक्री करून पहिल्या क्रमांकावर आणले आहे, किंमत 7.99 लाख रुपये आहे.
Tata Nexon : गेल्या महिन्यात 14,518 युनिट्सची विक्री करून ती देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली आहे. किंमत 7.60 लाख रुपयांपासून सुरू होते.
Hyundai Creta : सप्टेंबर 2022 मध्ये, Hyundai Motor India ने तिच्या लोकप्रिय SUV Creta च्या 12,866 युनिट्सची विक्री करून तिसरे स्थान मिळवले आहे.
क्रेटा खरेदी करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. स्पोर्टी डिझाईन, बेस्ट स्पेस आणि फीचर्सची लांबलचक यादी आणि पावरफुल्ल इंजिन यासाठी हे सर्वत्र लोकप्रिय आहे. ही 5 सीटर एसयूव्ही आहे.