Red Section Separator
भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी स्किन व्हायरसने मोठी हानी पोहोचवली आहे.लंपी स्किन व्हायरस या रोगामुळे गायींचा मृत्यू होतं आहे.
Cream Section Separator
एका सर्वेक्षणानुसार देशभरात आतापर्यंत सुमारे 70 हजार गायींचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.
आपल्या महाराष्ट्रात देखील या व्हायरसचा शिरकाव झाला आहे.
व्हायरसमुळे गायीचे दूध कमी होत आहे. याचा सर्वाधिक परिणाम दूध व्यवसायावर होत आहे.
गायींच्या दुधात लम्पी विषाणूचा प्रभाव निश्चितपणे दिसून येतो. परंतु ते दुधापासून दूर केले जाऊ शकते.
दूध काढल्यानंतर प्रथम दूध चांगले उकळून घ्यावे व नंतर ते स्वच्छ भांड्यात ठेवावे.
असे केल्याने विषाणू दुधातच नष्ट होतात. यानंतरच तुम्ही गायीचे दूध वापरू शकतात.
म्हणजेच संक्रमित पशूंचे कच्चे दूध पिऊ नये मात्र संक्रमित पशूंचे दूध उकळून पिल्याने मानवी आरोग्याला कसलाच धोका निर्माण होत नाही.
आजपर्यंत देशात मानवांमध्ये लम्पी व्हायरसचा कोणताही प्रभाव दिसून आलेला नाही, परंतु तरीही वैज्ञानिकांनी ते टाळण्याचा सल्ला दिला आहे.