Red Section Separator

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यामध्ये नेमकं काय चाललंय, याची जोरदार चर्चा गेले काही दिवस सुरु होती.

Cream Section Separator

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी घटस्फोट घेतला आहे, अशीही चर्चा रंगली होती. पण ही अफवा असल्याचेच समोर आले.

या सर्व घटनाक्रमात चहलची पहिली पोस्ट प्रसिद्ध झाली. चहलने या पोस्टमध्ये, आपलं नवीन आयुष्य लोड होत आहे, असे म्हटले होते.

युजवेंद्र चहलच्या या पोस्टला धनश्री वर्माने चोख उत्तर दिले होते. धनश्रीने चहल हे आडनावच काढून टाकलं होतं.

युजवेंद्र चहल आणि धनश्री यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे या दोन्ही पोस्टमुळे सर्वांसमोर आल्याचे पाहायला मिळाले होते.

हे सर्व प्रकरण सुरु असताना चहलला धनश्रीने धमकी दिल्याचेही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे ऐकायला आले होते.

धनश्रीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये आपण माहेरी जात असल्याचे तिने म्हटले होते. पण ही धमकी नसून मजेशीर रील असल्याचे समोर आले.

चहल आशिया चषकासाठी युएईला रवाना झाल्यासाठी निघाला आणि त्याला सोडायचा धनश्री विमानतळावर आली होती.

यावेळी दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि या प्रकरणाला नवे वळण मिळाले.