Red Section Separator

भारतात कांदा लागवड जवळपास सर्वत्र केली जाते.

Cream Section Separator

राज्यात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली जाते.

रब्बी हंगामात कोणत्या जातींची लागवड केली पाहिजे याविषयी जाणून घेऊ

भीमा शक्ती :- भीमा शक्ती ही कांद्याची एक सुधारित जात असून या जातीची रब्बी हंगामात लागवड करता येणे शक्य आहे.

या जातीच्या कांद्याचा रंग हा लाल असतो. कांदा लागवडीनंतर 130 दिवसांत काढणीस तयार होतो. ही जात हेक्‍टरी 30 टन उत्पादन देण्यास सक्षम असते.

जाणकार लोकांनी दावा केला आहे की या जातीच्या कांदा हा सहा महिने टिकू शकतो. म्हणजे या कांद्याचे सहा महिने साठवणूक केली जाऊ शकते.

भीमा रेड :- कांद्याच्या या जातीची रब्बी हंगामात आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या जातीची मुख्यता मध्यप्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रा साठी शिफारस करण्यात आली आहे.

या जातीच्या रोपांची लागवड केल्यानंतर 110 ते 120 दिवसानंतर उत्पादन मिळण्यास सुरवात होते. या जातीपासून हेक्‍टरी 30 टनांपर्यंत उत्पादन मिळते