मित्रांनो वाल या पिकाची आपल्या महाराष्ट्रात तीनही हंगामात शेती केली जाते.
रब्बी हंगामात या पिकाची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात केली जाते तर उन्हाळी हंगामात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या पिकाची लागवड पाहायला मिळते.
या पिकाची शेती हलक्या ते भारी जमिनीत मात्र पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत केली पाहिजे.
शिवाय शेतकरी बांधवांनी वालाच्या सुधारित जातींची लागवड केल्यास त्यांना निश्चितच वाल शेतीतून चांगली कमाई होणार आहे.
कोकण भूषण :- मित्रांनो नावावरूनच समजतं की ही जात कोकणात विकसित झाली असावी. निश्चितच वालाची ही सुधारित जात दापोली येथे स्थित कोकण कृषी विद्यापीठ मध्ये विकसित करण्यात आले आहे.
पेरणी केल्यानंतर 55 ते 60 दिवसांनी या जातीच्या वालापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. या जातीपासून हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते.
पूना रेड :- या जातीची परस बागेत लावण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. या जातीच्या वाल पिकातून शेतकरी बांधवांना हेक्टरी 120 क्विंटल उत्पादन मिळू शकते.
अरका जय :- या जातीपासून हेक्टरी 70 ते 80 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे सांगितले गेले आहे. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे शेंगा सालीसकट भाजी करण्यास वापरली जाऊ शकतात.