Red Section Separator
दिल्ली क्राइम या वेबसीरीजचा दुसरा भाग नेटफ्लिक्सवर रीलीज झाला आहे.
Cream Section Separator
सीरीजमधील शेफाली शहा, रसिका दुग्गल आणि राजेश तेलंग यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
दिल्ली क्राईमचा पहिला सीजन निर्भया बलात्कार पीडितेवर आधारित होता, तो सीजन प्रेक्षकांना खुप आवडला होता.
शेफाली शहा डीसीपी वर्तिका चतुर्वेदीच्या भूमिकेत असून ती एका गुन्ह्याचा उलगडा करत आहे.
डीसीपी वर्तिका चतुर्वेदी आणि तिची टीम दिल्लीच्या चड्डी बनियान गँगचा शोध घेत आहे.
या चड्डी बनियान गँगने ९०च्या दशकात दिल्लीत दरोडे आणि खून असे गंभीर गुन्हे केले होते.
शेफाली शाहने या पोलीस अधिकार्याची भूमिका चांगली वठवली असून प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाला दाद दिली आहे.
दिल्लीच्या क्राईमच्या दुसर्या सीजनमध्ये शेफाली शहा सोबत रसिका दुग्गल, राजेश तेलंग, आदिल हुसैन, गोपाल दत्त, सिध्दार्थ भारद्वाज, डेन्ज़िल स्मिथ, यशस्विनी दयामा आणि तिलोत्तमा शोमसुद्धा आहे.