सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची लेक अभिनेत्री सारा अली खान नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्री सारा आली खान पुन्हा एकदा दिग्दर्शक करण जोहरसोबत काम करण्यास सज्ज आहे.
करण जोहरचा आगामी चित्रपट 'ए वतन.. मेरे वतन’मध्ये सारा दिसणार आहे.
चित्रपटात स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका ती साकारणार आहे.
चित्रीकरणाची सुरुवात येत्या सप्टेंबरमध्ये होणार असून सारा ह्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेताना दिसतेय.
भूमिका वास्तववादी वाटावी यासाठी ती प्रयत्नशील आहे. काही नवीन गोष्टीही शिकण्याचा ती प्रयत्न करत आहे.
हा चित्रपट १९४२ दरम्यान ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी उषा मेहता यांच्या अंडरग्राउंड रेडिओ स्टेशन ‘काँग्रेस रेडिओ’वर बेतलेला असेल.
या रेडिओनं भारताच्या तेव्हाच्या ब्रिटिश सरकारने सेन्सॉर केलेल्या बातम्या प्रसारित करून स्वातंत्र्यमोहिमेत मोलाचं योगदान केलं आहे. कन्नन अय्यर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
साराला नवीन भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.