Red Section Separator

'परिणीता'मधील तिचा निरागसपणा असो किंवा 'कहानी'मधील निर्भीडपणा...अभिनेत्री विद्या बालनचं कौतुक नेहमीच होतं.

Cream Section Separator

विद्याच्या सौंदर्याची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा होते ती विद्याच्या कपड्यांची... तिचे ड्रेसेस, फॅशनेबल साड्या नेहमी चर्चेत असतात.

साडीचं वेड असणाऱ्या विद्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल आठशे साड्या आहेत असा खुलासा अलीकडेच करण्यात आला आहे.

बॉलिवूडच्या पार्टीसाठी जायचं असो किंवा पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री विद्या बालन नेहमीच सुंदर साड्यांमध्ये हजेरी लावताना दिसते.

साडीमध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं असं तिचे चाहते नेहमीच म्हणतात.

कुठल्याही कार्यक्रमाला जाताना ती लक्षपूर्वक साडीची निवड करत असते.

साडीमध्ये ती ज्या कार्यक्रमांना जाते, तिथे तिचे त्या लूकमधले फोटोही चर्चेत असतात.

'माझा जन्मच साडी नेसण्यासाठी झाला आहे' असं विद्या म्हणाली होती.

'मी आयुष्यभर साडी नेसून फिरू शकते, मी साडी नेसून जगू शकते.त्यामुळे मला जेव्हा संधी मिळेल त्यावेळी मी साडी नेसते.' असं विद्या म्हणाली होती.