Red Section Separator

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे राज्यातील महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे.

Cream Section Separator

चला तर आज आपण एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकिर्द जाणून घेऊ

एकनाथ शिंदे यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या ठिकाणी झाला.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एकनाथ शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच होती.

शिंदे यांनी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरव्हायझर म्हणून काम केले होते.

त्यानंतर नोकरी सोडत त्यांनी ठाण्यात ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.

वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

२००१ मध्ये ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले.

२००४ मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले.

शिंदे यांनी या आधी २०१५ ते २०१९ पर्यंत सार्वजनिक बांधकाम या खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले.

पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एकनाथ शिंदेंनी पक्षासाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.