Red Section Separator

इंधनाचे वाढते दर पाहता ग्राहकांचा इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे कल वाढला आहे.

Cream Section Separator

अनेक दुचाकी निर्मिती कंपन्यांनी आपापली इलेक्ट्रिक वाहने बाजारात लॉन्च केली आहे.

नुकतेच हैदराबादमधील स्टार्टअप Atumobile Pvt Ltdने सुद्धा आपली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च केलीय.

Atumobile Pvt Ltdच्या Atum 1.0 इलेक्ट्रिक बाईकची सुरुवातीची किंमत रु 74,999 (एक्स-शोरूम) आहे.

तुम्ही फक्त 999 रुपयांमध्ये ही बाईक प्री-बुक करू शकता.

कंपनीने या बाइकमध्ये पोर्टेबल लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे, जी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 4 तास लागतात.

कंपनीचा दावा आहे की ही बाईक एका चार्जमध्ये 100 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते.

या बाईकची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ती चालवण्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचीही गरज नाही.

यात 6 किलोची बॅटरी असून ती पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 1 युनिट वीज लागते.

ही बाईक अवघ्या 7 रुपयांमध्ये 100 किमीपर्यंतची रेंज देईल.