Red Section Separator

हॉप इलेक्ट्रिक कंपनी आपली इलेक्ट्रिक बाइक Oxo 100 लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

Cream Section Separator

विशेष बाब म्हणजे या वर्षी जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला ही बाईक लॉन्च होऊ शकते.

तुम्हालाही ही बाईक बुक करायची असेल तर तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 999 रुपये भरून प्री-बुक करू शकता.

Oxo 100 ही बाईक स्पोर्टी डिझाइन आणि आकर्षक बॉडी स्टाइलसह येईल. जी यामाहा FZ V2.0 सारखे दिसेल.

सामान्य बाईकमध्ये जिथे IC इंजिन असते, तुम्हाला या आगामी बाईकमध्ये बॅटरी पाहायला मिळेल.

यासोबतच 'फ्युएल टँक'च्या बाजूला स्लीक इंटिग्रेटेड एलईडी लाइटिंग स्ट्रिप देण्यात आली आहे.

Oxo 100 मध्ये लिथियम-आयन बॅटरी पॅक आणि हब मोटर दिली जाऊ शकते.

या आगामी ई-बाईकची रेंज 100 ते 150 किमी असेल.

तसेच याची टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास असेल.

या बाईकची किंमत सुमारे 1.20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.