Red Section Separator

आजकाल इलेक्ट्रिक कारला देशात मागणी वाढत आहे.

Cream Section Separator

यातच जर तुम्ही देखील इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर या आहेत बजेटमध्ये येणाऱ्या टॉप 5 इलेक्ट्रिक कार

Hyundai Kona EV : Hyundai ने भारतात एक इलेक्ट्रिक SUV लॉन्च केली आहे, या कारची एक्स-शोरूमची किंमत 23.79 लाख रुपये इतकी असून ती एका चार्जिंगमध्‍ये 452 किमी पर्यंत धावू शकते.

Tata Nexon EV Max : Tata Motors ने भारतातील लोकप्रिय नैक्सॉन इलेक्ट्रिक SUV चं,  Naxon EV Max हे नवीन वर्जन लॉन्च केलं आहे. कारची किंमत रु. 17.74 लाख असून एका चार्जमध्ये 437 किमी पर्यंत चालवता येऊ शकते.

MG ZS EV MG Motor India ने भारतात 2022, MG ZS EV हे मॉडल मोठ्या प्रमाणात लाँच केले आहे. ज्याची स्टार्टिंग प्राईज एक्स-शोरूमला 21.99 लाख रुपये इतकी आहे. ही SUV आता एका चार्जवर 461 किमीचा प्रवास करते.

Tata Tigor EV : Tata Tigor EV ची एक्स-शोरूम स्टार्टिंग प्राईज 12.24 लाख रुपये इतकी आहे, तर टॉप मॉडेलसाठी 13.24 लाख रुपये आहे. एका चार्जमध्ये ही इलेक्ट्रिक कार 300 किमी पर्यंत धावते.

Tata Nexon EV : Tata Nexon EV सोबत, कंपनीने 30.2 kWh-R लिथियम-आयन बॅटरी पॅक दिला आहे, या कारची रेंज 312 असल्याचा दावा एआरएआयने केला आहे, या इलेक्ट्रिक कारसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे.

देशासोबतच जगातील वाहनांचे भविष्य आता इलेक्ट्रिक कार्सच्या दिशेने जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढते आहे.